पूर्वेला झुंजूमुंजू झाल.तांबड फुटलं.आळोखेपिळोखे देत रायगड उठला.रिवाजाप्रमाणे दरबारात मुजर्याला गेला.तसाच तिथून निघून होळीच्या माळावरील
महाराजांच्या प्रतिमेलाहि त्रिवार मुजरा केला.त्याच रस्त्याने पुढे जाऊन जगदीश्वराच आणि समाधिच दर्शन घेतलं त्याने आणि परत फिरणार तोच नजर गेली वाघ्याच्या समाधीवर.सहज पाहिलं त्याने वाघ्याच्या डोळ्यात तर थोडी भीती दिसली त्याला.कदाचित त्याचे शेवटचे काही दिवस आपल्याबरोबरचे!! मग एकतर हलवला जाईल किंवा उखडला तरी.फक्त हे करताना श्रींच्या समाधीला बाधा न व्हावी हीच इच्छा. "पण आपल्या इच्छेला कोण विचारतो?" अस म्हणत स्वतःशीच हसला रायगड..खिन्नपणे...
जगदिश्वराला वळसा घालून बाराटाकीवरून सरळ खालच्या रस्त्याला लागला, भवानी मंदिराकडे जायला आणि देव दर्शन उरकून नेहमीप्रमाणे जाऊन बसला टकमकीवर..आरामात..खाली दरीत पाय सोडून..समोरच खाली पाचाड दिसत होत..नकळत हात जोडले गेले त्याचे..आणि मनात विचार आला.."अरे आता राज्याभिषेक जवळ आला नाही का? म्हणजे मासाहेबांच श्राध्द पण जवळ आल..गेलोच नाही किती दिवस झाले पाचाडला..जाऊन येऊ एक दोन दिवसात !!!"
बराच वेळ रायगड तसाच बसून राहिला आणि अचानक कानांवर संगीताचे सूर पडले. आवाज महादरवाज्याकडून येत होता, तसाच उठला आणि
महादरवाजात आला. तिथे काही नवयुवक आणि नवयुवती आपल्या आधुनिकतेची साक्ष पटवून देत नको इतके खेटून बसले होते..पण आता सवय जाहली
होती रायगडाला याची. वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटत होत त्याला कि ज्या दरवाजातून एके काळी मोहिमांच्या नौबती ऐकत लाखो मावळे ये जा करायचे,
अनेक सरदार दरकदार दरबारी मुजर्याला जायचे. स्वतः महाराज आणि युवराजांचे घोडे, पालख्या मार्गक्रमण करायच्या आणि हे सगळ पाहत हा चीतदरवाजा आणि त्यावर डौलाने फडकणारा जरीपटका ताठ मानेने शिंग तुतार्यांचे आवाज ऐकत शिवरायांना मुजरे करायचा, त्याला आज कुठल्यातरी कामावर जाताना उशीर झाला म्हणून रिक्षावाल्याची वाट पाहणाऱ्या मुलीचा किंवा बदनाम झालेल्या मुन्नीचा बीभत्स आवाजातला आक्रोश ऐकावा व क्वचित पहावासुद्धा लागत होता.पण सांगणार तरी कुणाला आणि काय? खिन्न मनाने दरवाजाच्या पाठीवर मायेने थोपटत तो निघणार एवढ्यात त्यातल्या एका मुलाने आपल्या तोंडातील गोळीसारखा चघळण्याचा एक चिकट पदार्थ तोंडातून काढला, रबरासारखा ताणला आणि दरवाज्याच्या बुरुजावर दोन चीरेंच्या मधल्या फटीत चिकटवून दिला. त्याच पाहून आणखीही दोघांनी हेच केल. अनंत यातनांच्या कळा उठल्या बुरुजातून.."अरे नका रे अस करू..!!! हिरोजींनी मोठ्या प्रेमाने बांधलाय मला..." !!! पण व्यर्थ .. स्वतंत्र भारताचे ते सुजाण नागरिक रायगडावर स्वतःची आठवण ठेवून तिथून चालते झाले होते..हताश होत रायगड उठला....
असे हताश होण्याचे प्रसंग वारंवार येतात हल्ली.विशेषतः विजेरी पाळणा झाल्यापासून. सुशिक्षीत म्हणवणारी लोक येतात. जे पाणी पिऊन यांच्या पुर्वाजंनी मुघलांच्या, इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या पार्श्वभागाला घाम फोडला होता त्याच गडावरच तेच पाणी त्यांना "मानवत" नाही म्हणून विकत घेतात बाटल्या आणि टाकून देतात इथेच. प्लास्टिकच्या पिशव्यातून आणलेले ते खाद्यपदार्थ संपल्यावर त्या पिशव्याही इथेच टाकून देतात..
आणि परवा तर हद्दच झाली..कुठलातरी प्रेमज्वराने बाधित झालेला मदन स्वतःच आणि ज्या रतीमुळे हा ज्वर जडला त्या रतीच नाव कसल्यातरी धारधार वस्तूने बदामात कोरत होता..आणि कुठे तर सिंहासनाच्या मागे जी राजवाड्याची भिंत आहे तिथे...ढसाढसा रडावस वाटल...उर बडवून घ्यावासा वाटला. स्वतःलाच कडेलोट करून घ्यावासा वाटला..!! सांगणार तरी कुणाला ??
कस समजत नाही यांना कि ज्या गडांवर, तिथल्या तटा - बुरुजांवर कधीतरी यांच्या भीमपराक्रमी पूर्वजांच आसूद सांडला होत त्याच रणक्षेत्रांवर - शिवक्षेत्रांवर आपण निर्लज्जासारखे विड्या विझवतो, दारूच्या बाटल्या फोडतो यासारख दुसर पाप नाही ते ?
किंवा आपल्या बापाची जागा आहे अस समजून मन मानेल तशी आणि तिथे घाण करणे यालाच कदाचित लोकशाही म्हणत असावेत !!! आणि हीच असावी बहुतेक व्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या ....!!!!
मग वाटत आज राजे हवे होते, युवराज हवे होते..या असल्या बेमुर्वतखोरांचे हात-पाय कलम करून त्यांना समोरच्या लिंगाण्यावर कायमच डांबून ठेवलं असत राजांनी....!!!!
दिवसभराच्या या जखमांनी विव्हळ होत तो तसाच बसून राहिला..सूर्यास्त झाला तसा तो उठला...रिवाजाप्रमाणे दरबारात जाऊन मुजरा केला आणि होळीच्या माळावरून परतताना क्षणभर तो थबकला...महाराजांसमोर थोडा वेळ बसून रहावस वाटल....मुजरा करून तिथेच चौथार्यावर बसून राहिला तो....पुतळ्याकडे पाहताना आठवल त्याला महाराजांचं पहिलं दर्शन !!!
जावळीच्या मोर्यांच्या पाठलागावर राजे आले होते..चंद्रराव दडून बसला होता आपल्या पोटात. त्याचा खात्मा करायला राजे वर चढून आले आणि आपला हा धिप्पाड देह पाहून हरखून गेले.म्हणाले, "गड बहुत चखोट, चौतर्फा कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडीयावर गवत उगवित नाही आणि धोंडा तासीव एकच आहे.पाखरू बसू म्हणेल तर फांदी धरीत नाही. रायरी दशगुणी उंच.तख्तास जागा हाच गड करावा".माझ्या गुणांचं चीज करणारा पहिलाच राजा मला भेटला होता आणि मग राजांच्या दूरदृष्टीचे एकाहून एक प्रत्यंतर पुरावे येऊ लागले. हिरोजी इटलकरच्या हाती राजांनी सोपवलं आपल्याला आणि मग हिरोजींनी पोटाच्या पोराप्रमाणे सजवलं आपल्याला !!
मग उठला राज्याभिषेकाचा येळकोट ...... काय वर्णावा त्याचा थाट...त्याचा दिमाख...
आनंदनाम संवत्सरे, शालिवाहन शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राजे सिंहासनाधीश्वर जाहले...आणि मी त्या सिंहासनारूढ राजाच्या राज्याची राजधानी झालो...आणि त्यानंतर लगेच आऊसाहेब गेल्या ....महाराज दक्षिण दिग्विजय करून आले आणि जे अंथरूण धरल ते पुन्हा ........!!! विचार हि करवत नाही....याच होळीच्या माळावरून महाराज शेवटच्या मोहिमेवर गेले...महाराष्ट्राला पोरक करून....
मग तो नराधम औरंग्या आला महाराष्ट्रात...पण महाराजांच्या आशीर्वादाने शंभूराजांनी गाजविलेल्या पराक्रमापुढे तो हतबल झाला...मारलं त्याने शंभूराजांना पण त्याच चितेतून एक एक ठिणगी बाहेर पडून त्यांच्या ज्वाळा बनल्या....राजा आणि राजधानी गमावलेली असतानाही हा महाराष्ट्र लढला.....प्राणपणाने लढला...आणि शेवटी इथेच त्या दिल्लीपतीची कबर बांधून शांत झाला.
औरंगजेबासारख्या कळीकाळाशी निकराची साहसी छातीजुंझ घेणाऱ्या महाराष्ट्राची कूस इतकी वांझ कशी होऊ शकते ? सह्याद्रीहि तोच, समुद्रहि तोच...आणि हि मातीही तीच जिच्या सौभाग्यसाठी लाखो आयांनी आपली कूस उजाड करून घेतली,....अनेक बापांनी आपल्या तरण्याताठ्या पोरांच्या तिरडीला खांदा दिला.....अनेक बायकांनी आपल्या कपाळावरच कुंकू हसत हसत पुसलं. आणि तरीही आपला उरलेला वंश सुद्धा महाराजांवर,
स्वराज्यावर आणि जरीपटक्यावर ओवाळून टाकला त्या मातीला हे देशद्रोहाचे, भ्रष्टाचाराचे, स्वार्थाचे करंटे आणि दळभद्री डोहाळे लागावेत याउपर दुर्दैव ते कोणत ???
मग अचानक तो भानावर आला ते पहारेकर्याच्या शीट्टीने....आणि स्वतःशीच हसत म्हणाला... "महाराज आता आज्ञा व्हावी ,आमचे रात्रीचे सोबती आले". मग उठला सावकाश....कमरेत वाकून मुजरा केला महाराजांना आणि तसाच चार पावलं मागे गेला पाठ न दाखवता.....तिथून वळणार एवढ्यात काहीस आठवल, आणि म्हणाला राजांना, "महाराज, तुम्ही बांधल्यापासून आज जवळ जवळ ३६० वर्षे झाली मला ... माझच वय एवढ तर
सह्याद्रीच किती असेल? म्हातारे नाही झालो पण म्हातारपणाची जाणीव मात्र होते आजकाल हे सगळ बघून !!! अफजल आणि औरंग्या सारख्या नराधमांबरोबर तुमच्या खांद्याला खांदा देवून लढलो पण आता आपलीच पोर उरावर बसून छाती फोडायला लागल्यावर काय करणार? महाराष्ट्र विसरला तुम्हाला ...करू लागला विटंबना तुमची आणि गडांची तरी बेहत्तर... पण या रायगडाच्या, सह्याद्रीच्या आणि त्या दर्याभवानी समुद्राच्या नसानसात आणि कणाकणात तुमचा आणि मासाहेबांचा महाराष्ट्रधर्माचा मंत्र अजूनही धगधगतोय". तुमच्या या स्वराज्यधर्माची विटंबना करायला हा सह्याद्री बिसलेरी च्या पाण्यावर पोसलेला नाहीये...तुमचा वसा-वारसा विश्वाच्या अंतापर्यंत मी असाच पुढे नेत राहीन ...हि तुमच्या आणि मासाहेबांच्या पायाची आण !!! फक्त एक मागण आहे महाराज..."आपले पाय परत एकावर लागावेत या गडाला !!! " तुमची वाट पाहत अशी कैक युगे बसेन मी....मग पुन्हा एकदा नौबती झडतील, शिंगांचा कल्लोळ उठेल, तोफांच्या आवाजाने सह्याद्री आणि मावळ्यांच्या रणगर्जनांनी सारा महाराष्ट्र दणाणून निघेल...एकवार या राजे, एकवार या...आणि हो एकटे येवू नका .... मासाहेब आणि युवराजांनी हि आणा संगती...
इतक बोलून आणि परत एकदा मुजरा करून तो चालायला लागला ...झोपायला किंवा कदाचित झोपेच सोंग घ्यायला !!! दोन्हीपैकी एक काहीतरी त्याला करावच लागणार होत...!!!
--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||
प्रिय सारंग,
ReplyDeleteलेख काळजाला हात घालणारा आहे. कुणाही ख-या शिवभक्ताची झोप उडविणारा आहे.
रायगड जागाच आहे. तो जागा होता म्हणून तर आज आपण "हिंदू" म्हणवून घेऊ शकतो. त्याकाळच्या माताभगीनिनी आपले कुन्कुवाचे करंडे सांडले म्हणून आज आपल्या माता भगिनींच्या कपाळावर कुंकू (अथवा टिकली तरी) दिसते. नाहीतर इतर धर्मीय स्त्रियांप्रमाणे तीही दिसली नसती. रायगड म्हणजे केवळ रायरीचा किल्लाच नव्हे तर असे शेकडो गड, असे गडाप्रमाणे झुंजणारे असंख्य मावळे, आणि त्यांच्या पाठीमागे समर्थपणे उभा ठाकलेला सह्यगिरी. रायगड म्हणजे मराठी अस्मितेचा मानबिंदू, मराठी स्वाभिमानाची चरमसीमा. रायगड म्हणजे दिलदार मराठ्यांचा झुंजार जिगर. रायगड म्हणजे प्रखर, ज्वलंत राष्ट्राभिमान. रायगड म्हणजे शिवनिष्ठा. रायगड म्हणजे रयतेवरचे अपत्यवत प्रेम. रायगड आमचे मंदिर आहे, ज्याची अधिष्ठात्री देवता शिवाछत्रपती आहेत. किती किती म्हणून सांगू ... ?
रायगडाची तेजोप्रभावळ आचंद्रसूर्य असेल. जोवर हिंदू धर्म महाराष्ट्रात असेल, तोवर शिवनामाच्या तेजाने ती झळकत असेल.
अवकळा आली आहे ती "या" रायगडला नाही. ती येणारही नाही.
अवकळा आली आहे ती निपजलेल्या कांही कृतघ्न औलादीला. गडावर "तसली" गैरकृत्ये करणा-या बेमुर्वत्खोराना, त्या हरामखोरांना. त्यांचे रक्त खरेच ख-या हिंदूचे आहे कि असल्यांचा बाप गैरहिंदू आहे ते तपासायला हवे. मी म्हणतो, नक्की तसेच असेल. अन्यथा त्यांना असे करण्याची दुर्बुद्धी कशी होईल ? शिवकाळात देखील असली औलाद निपजली होतीच की. त्यांची कांही नावे इतिहासाला माहित आहेत. शिवरायांनी त्यांना जे शासन केले तेच शासन आजच्या असल्या निमकहरामाना व्हावयाला हवे. येथे गांधीगिरी उपयोगाची नाही. दान्डीगीरीच हवी. दिसता क्षणीच असे कृत्य करणा-यास प्रथम एक मुस्कटात भडकाविणे. पुढचे नंतर - गरजेनुसार.
- गणेश देवळे, ६ जून २०११
धन्यवाद सर,
ReplyDeleteशिकलेल्या लोकांना सुशिक्षित करण हि या देशाची सर्वात मोठी गरज आहे...
एवढ झाली तरी "भरून पावलं" अस वाटेल...
केवळ एकाच शब्द.... अप्रतिम!!!!!!!!!..
ReplyDeleteपुन्हा एकदा, सारंग तुझ्या लेखाने तरुण पिढीला विचार करायला भाग पडले आहे. खरेच तुझ्या या लेखातून गड किल्ल्यांची जी सध्या परिस्थिती आहे तिची तू योग्य शब्दात मांडणी केली आहे....
खरे पाहता ती एक लाजिरवाणी गोष्ट आहे. जे किल्ले महाराष्ट्राचे वैभव आणि ऐतेहासिक ठेवा आहेत, त्यांचा आजची तरुण पीडी खास करून प्रेमी युगुले त्यांच्या आचरट कामासाठी उपयोग करतात. गड वर गेल्यावर त्या गडाचा इतिहास समजून घेण्यापेक्षा त्यांना कोनाड्या मध्ये एकांत जागा कुठे भेटेल ते, ते शोधतात. कित्येक ठिकाणी सुरक्षा रक्षकच पैसे घेऊन किवा लक्ष न देता वरील कार्यना प्रवृत्त करतात. हि लज्जास्पद गोष्ट आहे.
या सगळ्या गोष्टी पेक्षा जास्त राग येतो तो सरकारच्या उदासीनतेचा...... सरकार ने या गोष्टीकडे लक्षच द्याचे नाही असे ठरवले आहे. फक्त राजकारण (समाधी, पुतळे) तेवढे त्यांना करता येते.
तुझा लेख वाचून तरी लोकांनी थोडा फार विचार करावा.... नाहीतर रायगडच काय इतर अनेकसे किल्ले नामशेष होतील. आणि पुढील पिढीला आपल्याला सांगावे लागेल कि
"शिवाजी महाराज खूप थोर आणि पराक्रमी होते. पण त्यांच्या पराक्रमची साक्ष देणारे ते किल्ले आज नाहीत."
धन्यवाद हर्षल,
ReplyDeleteहि केवळ रायगडाची नाही तर जवळ जवळ सर्वच ऐतिहासिक स्थळांची व्यथा आहे,.....
गडांवर एकांतीच्या जागा शोधणार्या त्या सर्व तरुणांसाठी माझ्याकडे शब्द नाहीत...
म्हणून मी समर्थांच्या शब्दात फक्त एवढच त्यांना सांगतो,
याहुनी करावे विशेष || तरीच म्हणवावे पुरुष ||
यापरते आता विशेष || काय लिहावे ||
khupch chan vykt kel ahes..!
ReplyDeleteThanks Prachi !!!!
ReplyDeleteमित्रा, सुरेख लिहिलं आहेस... खरच वाचून वाटतं काहीतरी करावं आता आपणच.... आपल्या राजांच्या गडांची अशी अवस्था पाहवत नाही... जागरूकतेच उत्तम काम करत आहेस. या कामात काही मदत लागली तर असेन तिथून शक्य ती मदत करेन... खरच वाटत "आता महाराजांनी परत यावच......."
ReplyDeleteThanks Aniruddh !!!! khup dhanyavad....
ReplyDeletetujha mail id deu shakatos ka ???
khup goshti karayachya ahet....
garaj ahe SAMARTH HATANCHI !!!!
छान जमलायरे लेख, तंबी दुराई ची आठवण आली.
ReplyDeleteधन्यवाद प्रसाद !!!
ReplyDeleteखोट्या विनयाने लिहित नाही पण " तंबी दुराई " खूपच मोठे आहेत.......
तिथवर पोहोचायला अजून खूप खूप वाचायचं आहे आणि अनुभवायचं आहे....
अभिप्राया बद्दल खूप आभार
anirudha.aranke@gmail.com
ReplyDeleteor anirudha.aranke@yahoo.co.in dhanyawaad!
सारंग मित्रा लेख खरच काळजाला हाथ घालनारा आहे, मला फ़क्त एकच म्हनायचे आहे की खरच आजच्या ह्या तरुणाईला या धार्मिक व ऐतीहासिक स्थळांचे महत्व कळत नाही का? रायगडा सारख्या पवित्र जागेत यायचे यांचे असे क्रुत्य करायचे धाडस कसे होते? खरेतर आज आपल्या सारख्या मुलांनी या आपल्या ऐतीहासिक वारसांचे जतन करन्याची जबाबदारी घ्यायला हवी .......... आणि शेवटी एकच वाक्य सांगतो
ReplyDelete" राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, या वेळेस ते भाग्य आमच्या कुटुंबाला द्या "
लाख मोलाच बोललास शेवटच वाक्य संदीप......
ReplyDeleteआज प्रत्येक घरात शिवबा जन्मवायास हवाय...
अभिप्रायाबद्दल आभार !!!
Mastach lihlays re!!
ReplyDeleteखरच दादा कालजाला हात घालणारा लेख लिहिलात आपण . . .
ReplyDeleteमंदिराच पावित्र्य हे भक्तालाच कलते . . . त्या हरामखोराना काय माहित या गड-दुर्गांची, ऐतिहासिक वास्तुंची किम्मत . . . किती रक्त सांडाव लागल यासाठी ते? आपल्या मराठी लोकांच दुर्दैव आहे की विरोध करावा लागतो तो आपल्याच लोकाना . . . शेवटी राजांना लढावे लागले ते अस्तानितल्या निखार्यांशिच . . .
आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत